

मराठी बद्दल सध्या भरपूर भाषणं होत आहेत. मराठी माणसाचा स्वाभिमान जागवायाचे भरपूर प्रयत्न सुरु आहेत. पण हे सगळे रास्त आहेत असं नाही . अमराठी लोकांची मारहाण करणं हे तर अगदी मराठ्यांच्या सुस्वभावा विरुद्ध .
पण जनजागृति तर झालीच पाहिजे . आणि संतोष मांजरेकर ह्यांचा नवीन चित्रपट "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा एक खुपच चांगला मार्ग आहे . मुन्नाभाईच्या थीम वर असलेला हा पिक्चर सुरु होतो डोम्बिवली फास्ट सारखाच . एका सामान्य मराठी बँक कर्मचार्यापासून ही कथा सुरु होते . सगळीकडे होणारा आपला अपमान सहन करून मराठी असल्याची लाज वाटायला लागलेल्या भोसल्यान्ना वेड लागायची पाळी येते . हे सर्व पाहून हिंदू नृसिंह प्रभु शिवाजीराजे खुप बेचैन होतात . ते तड़क रायगडावरुन निघतात आणि भोसल्यान्ना गडावर आणून चांगली कान उघडणी करतात . भोसले जागे होतात आणि मग सुरु होते त्यांची पराक्रमी घोडदौड .
भोसल्यांची भूमिका सचिन खेडेकरनी फार छान बजावली आहे . फारश्या विनोदी भूमिका न करणारा सचिन ह्या भूमिकेत सर्व पैलू दाखवतो. त्याच्या बर्याच विनोदांना हास्य व टाळ्या तर प्रत्येक आश्रुला प्रेक्षकांकडून आश्रू.सुचित्रा बन्देकरचं काम पण मिसेस भोसले म्हणुन चांगल झाल आहे . प्रिया बापटनी भोसल्यांच्या मोठ्या मुलीचा रोल सुंदर केला आहे आणि अभिजित केळकरनी धाकट्या मुलाचा . सिद्धार्थ जाधवनी गुंडाच काम पहिल्यांदाच सीरियसपणे केलय . पण सगळ्यात महत्वाची महाराजांची भूमिका बजावताना संजय मांजरेकर मात्र खुप कमी पडतात . त्यांच्यापेक्षा सचिनच्या आवाजात जास्त जोर वाटतो .त्यापेक्षा अजिंक्य देव खुप शोभला असता असा वाटत. मकरंद अनासपुरेच काम नेहेमिप्रमाणे टाळ्या घेउन जात .
चित्रपटाचं संगीत ठीक-ठाक आहे पण "हे राजे" गाणं मनात घर करतं . बाकी सर्व तंत्रज्ञान नविन आहे पण मुन्नाभाई ची वास्तवता ह्या चित्रपटात कमी पड़ते . पण त्याचे विशेष नाही ; एकुण हा चित्रपट कमीतकमी एकदा पहाण्यासारखा आहे . मी ४ तारे देतो .
हर हर महादेव !!!!
रेटिंग - * * * *
3 comments:
परिक्षण चांगलं जमलं आहे. थोडं विस्तृत लिहीता आलं असतं असं वाटलं. तुझ्या खालच्या पोस्टचा फाँट मोठा कर, वाचायला कठीण जातंय.
- अमोल
Review vachlya nantar movie baghaysarkha vatay! Thanks!
Prachi
marathit review lihilas he agadich swagatarha ahe pan aapan marathi mansanni marathi lihitana shuddha lekhanabaddal jagaruk rahaylach hava asa mala vatata. marathi bhasha jagavnyachi talmal dakhavtana he far mahatvacha paula ahe.
baki review chhan lihila ahes pan mi amolshi sahamat ahe. thoda anakhi vistrut lihila asatas tar ankhi chhan jamala asata..
Post a Comment