Thursday, December 24, 2009

Panchratna Haar


I wish to write this blog in both English and Marathi...for the English version, please scroll down.

काही दिवसांपूर्वी मी माझ्या सऊला म्हटल की बर्याच दिवसांपासून गाण्याचा कार्यक्रम नाही पाहिला. त्यातून मधले चार महीने तर बाहेरच होतो. ह्या वर्षी दिवाळी पहाटचा कार्यक्रम पण बघायला कुठे गेलो नव्हतो. त्यानंतर १-२ चांगले कार्यक्रम आले होते पण जाणं काही झालं नाही. आणि काही दिवसातच भाऊ म्हणला की डोम्बिवलीला सारेगामापा लिटल चॅम्प्सचा कार्यक्रम होणार आहे. हे ऐकून माला "भगवान जब देता है ..." ह्या म्हणीची आठवण झाली.

अर्थातच मी जायचं ठरवलं, ते ही ५०० चं टिकिट काढून. १९ ता ला कार्यक्रम होता. सऊला माहेरी असल्यामुळे यायला जमणार नव्हतं. मी तिला सहानुभूति दाखवली (आणि मनात टुकटुक केलं) कारण तिला पण कार्यक्रम बघायची खुप इच्छा होती. मी भाऊ आणि वहिनी जाणार असं ठरलं. त्याप्रमाणे मी ६ लाच डोंम्बिवालिच्या घार्डा सर्कल च्या मैदानात पोहोचलो. लोकांची अलोट गर्दी यायला सुरुवात झालीच होती. आणि काही मिनिटातच पंचरत्नं तिथे येउन पोहोचले. इतके महीने ज्या रत्नांना टिव्हीवर पाहून मन भरत नसे ते आज डोळ्यासमोर आल्यावर सहाजिकच डोळ्याची पार्णँ फिटली. सगळेच मागच्या वर्षी पेक्षा उंच झाले होते. त्यांच्या पाठोपाठ ५ मिनिटातच पल्लवी ताई (मुलांची, माझी नाही) तिथे आली. वाद्यवृन्दाचे घटक एक एक करत येतच होते. निलेश परबला इतक्या जवळून पाहून खुप बरं वाटलं. भाऊ आणि वहिनी आले आणि आम्ही आत गेलो.

७.३० च्या सुमारास कार्यक्रम सुरु झाला. आयोजकांनी प्रेक्षकांच स्वागत केलं आणि सूत्र पल्लवीच्या हातात देताच तिने नेहेमी सारखाच कार्यक्रम दिमाखात सुरु केला. झी मराठीच्या नांदीने सर्व चॅम्पसनी सुरुवात कली. त्यानंतर प्रत्येक चॅम्पसनी येउन एक एक भक्ति गीत म्हटले. त्यांचे ते दिव्य आवाज पुन्हा ऐकून कान तृप्त झाले.
मग प्रत्येकाने आपापले लोकप्रिय झालेलं गाणं म्हणायला लागले आणि कार्यक्रमाला रंग चढायला लागला. त्यातून एकाचे एक गाने झाले की पल्लवी अजुन एक लोकप्रिय झालेलं गाणं लगेच म्हणायला सांगत होती. त्यामुळे एक पे एक फ्री ऑफर मिळाली. त्यामुळे आर्याचं "माझ्या पायाला बांधलाय भवरा " नंतर लगेच "अहो सजणा " ऐकायला मिळणं म्हणजे एक प्रकारची पर्वणीच. तसच रोहित नी "मोरया मोरया" आणि कार्तिकिनी "कांदा मूळा भाजी" ही गाणी सादर कली. त्यानंतर हिंदी गाण्यांची एक फेरी झाली. आणि कार्तिकी देविन्नी "ओ लाल मेरी" म्हणून जीव खुश करून सोडला. त्यानंतर सत्कार समारंभ झाला आणि शेवटच्या फेरीत सगळी नविन गाणी सादर झाली. ही ५ ही गाणी अफलातून झाली. स्टेज समोरची मोकळी जागा रोहितच्या बोलावण्यावरुन नाचण्यासाठी भरून टाकली. कार्यक्रमाचा शेवट कार्तिकिच्या "कोमडी" गीताने झाला. आम्हा तिघांच्या तोंडातून नुसता "वावाकार" होत होता।

ह्या सगळ्यात सिंहाचा वाटा होता तो वाद्यवृन्दाचा. निलेशनी तर "रेशमाच्या रेघांनी" गाण्याच्या सुरुवातीची ढोलकी वाजवून सगळ्यान्ना मोहित करून ताकलं. ती पूर्ण संध्याकाळच अविस्मरणीय झाली. कार्यक्रम संपूच नये अस वाटत होत. पण तो जरी संपला तरी चॅम्पस ची ही घोडदौड कधीच संपू नये अशी आपल्या सर्वांचीच सदिच्छा आहे, नाही का?

And now in English -

Lately I felt that i hadn't attended a good musical program since a long time this year. The 4 months in summer were in UK and after that not very interesting programs came up (good excuse na...). Even the early morning Diwali programs were not as good as last year. Last year we had attended the b'day program of Pt. Hridaynath Mangeshkar and Asha tais surprise arrival was like a double Diwali bonus.

But then a few days back my cousin told me that the lil' champs are performing live at Dombivali on the 19th Dec. Of course I went; all loaded with my Canon S2 IS. I reached quite early but people had already started pouring in. And within half an hour the champs arrived. The jewels who were seen only on TV till then were right infront of my eyes and I was thrilled. These five have become the beloved Panchratna set of all the people of Maharashtra. And they were followed by the one and only, Pallavi Joshi. She does have glamour in her and is a crowd puller. People started clapping seeing her and as if following her famous "एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत" line. The orchestra was coming in pieces and by 7.30 the show began.

The organisers introduced the cause of the show and handed over to Pallavi and off she was with her regular sweetness. The five started the show with the Zee Marathi song. Listening to those divine voices again, that too live, was bliss. Then followed a round of religious songs and then each of them sang their popular tracks. And was asked to sing another one immediately by Pallavi. So Arya sang "Maazya paayala" and "Aho sajana" back to back. It was like a buy one get one free offer. After this there was a round of Hindi songs which were equally popular, esp. Kartiki's "O laal meri" thrilled the audience. The last round after a small felicitation was that of new marathi songs like "Ye go ye" by Rohit, "Navri natali" by Kartiki and "Chham chham karta" by Arya. The show concluded with Kartiki's "Kombdi", the most popular marathi song today.

A huge round of applause was also regularly given to the musicians who were ammazing. Nilesh was the favorite with his mindblowing dholki rendition for various songs, esp. "Reshmachya reghanni" for Kartiki. It was a unforgetful evening and will be like a benchmark for many to come. The champs schedule was the longest one on Zee Marathi and I am sure the career path of each of these champs will be equally long. Bless all the Panchratnas. May you continue to entertain us for ages to come..